नवविवाहिता आत्महत्त्येप्रकरणी दोघांविरु द्ध गुन्हा
By Admin | Updated: January 29, 2016 23:04 IST2016-01-29T22:52:39+5:302016-01-29T23:04:34+5:30
नवविवाहिता आत्महत्त्येप्रकरणी दोघांविरु द्ध गुन्हा

नवविवाहिता आत्महत्त्येप्रकरणी दोघांविरु द्ध गुन्हा
सटाणा : शहरातील नामपूर रोडवरील सीमानगर येथील नवविवाहितेच्या आत्महत्त्येप्रकरणी पती व सासऱ्याविरुद्ध सटाणा पोलिसांत शुक्रवारी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील टाकळी पिंपरी येथील रहिवासी कविता व योगेश कैलास पाटील हे नवदांपत्य नोकरीनिमित्त सटाणा शहरातील सीमानगर भागात भाड्याने राहत होते. आठ दिवसांपूर्वी कविता पाटील (२०) हिने पती घरात नसताना खोलीत गळफास घेऊन आत्महत्त्या केली. पती योगेश दुपारी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. कविताचे वडील लक्ष्मण पाटील यांनी सटाणा पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून, पती योगेश व सासरा कैलास पाटील यांनी प्लॉट घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र मागणी पूर्ण न केल्यामुळे कविताचा छळ सुरू होता, असे तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर)