वृक्ष तोडल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 21:38 IST2017-08-16T21:38:35+5:302017-08-16T21:38:43+5:30

वृक्ष तोडल्याप्रकरणी गुन्हा
नाशिक : महापालिका उद्यान विभागाची कुठलीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीरपणे दोन वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी संशयित युसूफ इंकवाला यांच्याविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युसूफ यांनी तिगरानिया रस्त्यावरील रो-हाऊसशेजारी असलेल्या बुच व काटेरी बाभुळ या प्रजातीच्या वृक्षांची विनापरवानगी कत्तल केली. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर उद्यान निरीक्षक बबन कटारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा के ला. त्यांनी युसूफ यांच्याविरुध्द दिलेल्या फिर्यादीवरून पर्यावरण संरक्षण व राज्य नागरी क्षेत्र झाडाचे जतन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.