आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: October 5, 2016 02:08 IST2016-10-05T02:05:38+5:302016-10-05T02:08:37+5:30

आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

Offense to motivate suicide | आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

नाशिक : रस्त्यात भांडी घासण्याच्या कारणावरून शेजारच्या महिलांकडून होणाऱ्या सततच्या छळास कंटाळून पंचवटीतील शनिमंदिरामागे राहणाऱ्या निशा अशोक पवार (२०) या महिलेने बुधवारी (दि़२८) राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते़ त्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला़
सरिता धोत्रे यांनी पंचवटी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सरुबाई बाबूराव म्हस्के (५०) व रिना देवराम धोत्रे (वय २३, रा. दोघी धोत्रे चाळ, पंचवटी) या दोघी रस्त्यात भांडी घासत असल्याच्या कारणावरून नेहमी पवार यांना त्रास देत होत्या़ बुधवारी या दोघींनी वाद घालून जबर मारहाणही केली होती़ या दोघींच्या त्रासास कंटाळूनच पवार यांनी आत्महत्त्या केल्याचेही फिर्यादित म्हटले आहे़ याप्रकरणी पोलिसांनी सरुबाई म्हस्के व रिना धोत्रे या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Offense to motivate suicide