शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ‘त्या’ चार नगरसेवकांना ‘शुभेच्छा’ देणे भोवले; मनपाच्या नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 14:31 IST

कायदा सर्वांना समान असून कायद्याचे उल्लंघन करत अनधिकृतरित्या शुभेच्छा फलक झळकाविणे चार नगरसेवकांना चांगलेच भोवले आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांना बेकायदेशीरपणे शुभेच्छा फलक उभारण्याच्या नियम व कायद्याचा विसर पडला

नाशिक : मनपा प्रशासनाची कुठलीही पुर्व परवानगी न घेता शहरात रमजान ईदनिमित्त शुभेच्छा फलक अनधिकृतपणे उभारून विद्रूपीकरण केले तसेच कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाच्या चार नगरसेवकांविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात कुठलेही फलक उभारण्यापुर्वी महापालिका विभागीय अधिकाऱ्यांची पुर्व परवानगी मिळविणे आवश्यक असून निश्चित करून दिलेल्या जागेवर फलक उभारण्यास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवानगी दिली जाते. विना परवानगी अनधिकृतरित्या फलक उभारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. कायदा सर्वांना समान असून कायद्याचे उल्लंघन करत अनधिकृतरित्या शुभेच्छा फलक झळकाविणे चार नगरसेवकांना चांगलेच भोवले आहे. पुर्व विभागातील वडाळारोडवरील महापालिके च्या भुखंडाची संरक्षक भिंत असो, तसेच सारडा सर्कल भागातील दुभाजकाचा आधार घेत व वाहतूक बेटावर संबंधितांच्या कार्यकर्त्यांनी फलक उभारले. याप्रकरणी महापालिकेच्या पुर्व विभागातील कर्मचा-याकडून संबंधितांविरूध्द लेखी फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी नगरसेवक तथा आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा या चौघा संशयितांविरूध्द पोलिसांनी महाराष्ट प्रिव्हेशन आॅफ डिफेन्समेंट आॅफ प्रॉपर्टी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आला.महापालिकेच्या नियमांचे पालन करून त्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी नगरसेवकांची असताना स्वत: नगरसेवकांकडून जेव्हा नियम, कायदे धाब्यावर बसविले जातात तेव्हा मात्र आश्चर्य व्यक्त केले जाते. एक दोन नव्हे तर चारही नगरसेवकांना बेकायदेशीरपणे शुभेच्छा फलक उभारण्याच्या नियम व कायद्याचा विसर पडला हे विशेष! सर्रासपणे त्यांच्या आदेशावरून कार्यकर्त्यांनी शहरातील रस्त्यांचे दुभाजक, वाहतूक बेट, मनपाच्या मोकळ्या भुखंडांच्या संरक्षक भींतींवर नगरसेवकांना ‘झळकविले’ मात्र महापालिकेच्या पुर्व विभागाकडून संबंधित लोकप्रतिनिधींविरूध्द विनापरवानगी फलक उभारून शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस उपनिरिक्षक एन.एफ.जाधव करीत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRamzan Eidरमजान ईद