शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

By Admin | Updated: September 6, 2016 22:18 IST2016-09-06T22:18:04+5:302016-09-06T22:18:51+5:30

विद्यार्थीच बनले शिक्षक : लासलगावी सांस्कृतिक कार्यक्रम; अंदरसूल येथे गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांकडून अध्यापनाचे अनुभव कथन

On the occasion of the Teacher's Day, various programs in the district are excited | शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात


नाशिक : शिक्षक दिनानिनिमित्त जिल्ह्यातील विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली. अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात
आले.
येवला : श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रशांत भंडारे, संस्थेचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते भूषण लाघवे, प्राचार्य कदम डी. के. कदम आणि प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतरकर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. बळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. के.वी. ढमाले यांनी केले.
लासलगाव : येथील मिशन स्कूलमध्ये शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थिनींनी एक दिवस शिक्षकांची भूमिका स्वीकारत वर्गात तास घेतले. सांस्कृतिक कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी अनेक कलागुण सादर केले . यावेळी शाळेचे प्राचार्य जोसेफ खडांगळे, एम.जे. मोहनराव, ट्रेझरर असित हलडार, रु बी खडांगळे, शकुंतला राव, सुदर्शन आदि उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी
शिक्षकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील गाणी सादर केली. काहींनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यात पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कलाकृती सादर केल्या. तसेच शिक्षकांनीही प्रतिक्रि या मांडल्या.
अंदरसूल : येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणनू साजरी करण्यात आली. या वेळी भरत धुमाळ, सुरेखा धुमाळ, राजूभाऊ बांगर, संतोशजी केंद्रे, बळूभाऊ धुमाळ, प्रवीण धुमाळ व नितीन सुराडे यांच्या हस्ते राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात
आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची
भूमिका पार पाडली. विद्यार्थ्यांनी अतिशय चोखपणे दैनंदिन कामकाज पार पाडले. विद्यार्थ्यांना आवडीने शिकवत त्यांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळविला. विशेष
म्हणजे प्राचार्यांचीही भूमिका विद्यार्थ्याने साकारली. यासाठी शाळेचे मुख्याध्यानक विक्र म मिंगलानी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या जन्म दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची
भूमिका साकारून दिवसभर आध्यापनाचे कामकाज केले. शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. आहेर, शिक्षक बी. वाय. सोनवणे, आर. एस. निकम, युवराज दाणी आदि शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस. एस. आहेर, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूनम बच्छाव या विद्यार्थिने केले.आभार पल्लवी शेवाळे हिने मानले. (लोकमत चमू)

Web Title: On the occasion of the Teacher's Day, various programs in the district are excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.