शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

शासकीय कामात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:40 PM

सिन्नर : सिन्नर पोलीस ठाण्यात दंगा करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीच्या भांडणात समन्वय घडवून आणणाऱ्या पोलीस कर्मचाºयाला मारहाण करून पोलीस ठाण्यात धुमाकूळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यातील टेबल खुर्च्यांची आदळआपट करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.

सिन्नर : सिन्नर पोलीस ठाण्यात दंगा करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीच्या भांडणात समन्वय घडवून आणणाऱ्या पोलीस कर्मचाºयाला मारहाण करून पोलीस ठाण्यात धुमाकूळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.तू आता पोलिसांत तक्रार दिली आहे. सकाळपर्यंत तुझा मर्डर करतो असे म्हणून पती ज्ञानेश्वर उत्तम बोडके यांनी पत्नी मनीषा हिस बोलून मारण्यासाठी धावला. पत्नीला मारण्यास धावून जात असताना पोलीस कर्मचारी मच्छिंद्र पिठे यांनी ज्ञानेश्वरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. उलट पोलीस कर्मचाºयाची गच्ची पकडून पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हाताच्या चापटीने मारहाण करण्यासह शासकीय गणवेशाचे नुकसान केले. यावेळी भाऊ संदीप व सोपान यांनी आम्ही पण पोलीस आहोत, तू कशी नोकरी करतो तेच दाखवितो असे बोलून दमदाटी केली.याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी या सात संशयितांविरोधात शासकीय कामात अडथळा व जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अशोक रहाटे अधिक तपास करीत आहेत. पोलीस शिपाई शार्दूल यांच्या हातातून मोबाइल घेऊन तो जमिनीवर आपटून नुकसान केले. ज्ञानेश्वर बोडके यांच्या मदतीला आलेले नातेवाईक संशयित दीपक शेळके, सोपान बोडके, समाधान बोडके, तुषार बोडके, संदीप बोडके, उत्तम बोडके (सर्व रा. जामगाव, ता. सिन्नर) यांनी मिळून पोलीस कर्मचाºयास शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार फिर्यादीत करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातील जनरेटरच्या टाकीचे झाकण फेकून मारल्याचा प्रकारही यावेळी घडला. पोलीस ठाण्यातील टेबल खुर्च्यांची आदळआपट करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.