पोलीस पत्नीसोबत अश्लील वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST2021-05-20T04:15:53+5:302021-05-20T04:15:53+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयामधील पोलीस कर्मचारी महिनाभरापासून सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून कर्तव्य बजावत आहेत. जेलरोड येथे राहणाऱ्या एका ...

Obscene behavior with police wife | पोलीस पत्नीसोबत अश्लील वर्तन

पोलीस पत्नीसोबत अश्लील वर्तन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयामधील पोलीस कर्मचारी महिनाभरापासून सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून कर्तव्य बजावत आहेत. जेलरोड येथे राहणाऱ्या एका पोलिसाची पत्नी गेल्या शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पार्किंगच्या आवारात वाॅचमनकडून साफसफाई करून घेत होती. यावेळी संशयित पप्पू नाना गरुड हा तेथे आला आणि वॉचमनला शिवीगाळ केल्यानंतर गरुड याने पीडित महिलेच्या जवळ जाऊन त्यांचा हात पकडून स्वतःच्या दिशेने ओढत अश्लील वर्तन करू लागला. यावेळी महिलेने पप्पूला धक्का देत बाजूला पाडले आणि घरात धाव घेऊन दरवाजा बंद करून घेतला. आई रडत रडत घरात आल्याने घरात मुलीने आईला काय झाले? का बरे रडते असे विचारल्यानंतर पीडित आईने मुलीला सर्व प्रकार सांगितला. मुलगी घराबाहेर आली आणि तिने सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या संशयित पप्पू गरुड याला विचारणा केली असता, पप्पूने मुलीलाही शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच ‘तुमची सर्वांची वाट लावतो’ असा दम देऊन तेथून काढता पाय घेतला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित गरुडविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Obscene behavior with police wife