प्रशासनाधिकारीपदाचा कार्यभार देण्यास आक्षेप
By Admin | Updated: April 15, 2015 00:31 IST2015-04-15T00:30:51+5:302015-04-15T00:31:15+5:30
प्रशासनाधिकारीपदाचा कार्यभार देण्यास आक्षेप

प्रशासनाधिकारीपदाचा कार्यभार देण्यास आक्षेप
नाशिक : महापालिका शिक्षण मंडळातील एका वादग्रस्त प्रशासनाधिकाऱ्याची बदली झाली असून, त्याजागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. हा अधिकारी पूर्वी वादग्रस्त होताच; परंतु संबंधित अधिकारी रुजू होईपर्यंत महापालिकेने सहायक आयुक्त वसुधा कुरणावळ यांची नियुक्ती केली आहे. त्यांची यापूर्वी याच पदावरील नियुक्ती वादग्रस्त ठरली असल्याने मनसेच्या महापौरांनीच चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अनेक घोटाळ्यांचे आरोप असलेल्या कुरणावळ यांच्याकडे प्रशासनाधिकारीपदाचा कार्यभार देण्यास मनसेचे एक नगरसेवक संदीप लेनकर यांनी आक्षेप घेतला आहे.महापालिका शिक्षण मंडळाच्या विद्यमान पदाधिकारी असलेल्या किरण कुंवर यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यानंतर त्यांना मूळ सेवेत पाठविण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत करण्यात आला. त्याची दखल घेत राज्य शासनाच्या शिक्षण खात्याने कुंवर यांची बदली केली. त्यामुळे मंडळाच्या प्रशासनाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार महापालिकेच्या सहायक आयुक्त वसुधा कुरणावळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. कुंवर यांच्या नियुक्तीआधी अशाच प्रकारे कुरणावळ यांच्याकडे कार्यभार होता. त्यावेळी त्यांनी अनेक घोटाळे केल्याचा आरोप महासभेत करण्यात आला होता.