शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपा आयुक्त मुंढे यांच्या वाहिन्यांवरील मुलाखतीला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:20 IST

अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखत देताना तुकाराम मुंढे आपली बाजु मांडत आहेत. मात्र असे करताना नगरसेवकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका होत असून त्यांच्या हेतुविषयी शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.

ठळक मुद्देराज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रारराज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार: कारवाई करण्याची मागणी

नाशिक -  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आल्यानंतर त्यांनी विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमधून भाजपासह अन्य नगरसेवकांना अप्रत्यक्षरीत्या टीका होऊ लागल्याने   एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून मुंढे यांच्या मुलाखतीला आक्षेप घेण्यात आला असून यासंदर्भात राज्यशासनाच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरूध्द सत्तारूढ भाजपाच्या पुढकाराने अविश्वास ठराव आणण्यात आला असून १ सप्टेंबर रोजी विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. दरम्यान, अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखत देताना तुकाराम मुंढे आपली बाजु मांडत आहेत. मात्र असे करताना नगरसेवकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका होत असून त्यांच्या हेतुविषयी शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सातपूरच्या शिवाजी नगर भागातील रवी संपत पाटील या कार्यकर्त्याने थेट राज्याच्या सचिवांकडे तक्रार केली आहे. मुंढे यांच्या मुलाखती म्हणजे नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार अशाप्रकारे कोणत्याही अधिकाऱ्याला अशाप्रकारे आपली भूमिका जाहिर करण्याचा अधिकार आहे काय असा प्रश्न करण्यात आला आहे. संबंधीत अधिकारी प्रशासकिय सेवेतील असल्याने त्यांना वर्तवणूकीसंदर्भात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही नियमाने अशी जाहिररीत्या भूमिका घेणे आणि व लोकप्रतिनिधीस प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हेत्वारोप करण्याचे स्वातंत्र्य करण्याचे स्वातंत्र्य आहे काय याचा खुलासा करून कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेState Governmentराज्य सरकार