ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक पुढे ढकलू शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:18 IST2021-09-05T04:18:55+5:302021-09-05T04:18:55+5:30
ओबीसींच्या आरक्षणाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही; मात्र ओबीसींचे आरक्षण वाचवता येईल, यासाठी काम सुरू करण्यात ...

ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक पुढे ढकलू शकते
ओबीसींच्या आरक्षणाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही; मात्र ओबीसींचे आरक्षण वाचवता येईल, यासाठी काम सुरू करण्यात आले असून, ते करीत असताना निवडणुका तोंडावर असल्याने प्रसंगी दोन ते तीन महिने निवडणूका पुढे ढकलाव्या लागल्या तर सरकार त्यावर विचार करू शकतो, असे सांगून ओबीसींना प्रत्येक राज्यात आरक्षण असल्याने त्या त्या राज्य सरकारने ते दिले पाहिजे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
चौकट===
सर्वात वर तीन पक्षांचे नेते
राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी, शिवसेना सर्वांच्या वर आहे, या संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना भुजबळ म्हणाले, ‘‘सगळ्यांच्या वरती तीन पक्षांचे शीर्षस्थ नेते आहेत. त्यात सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे आहेत. या तिघांच्या वर कोणीही नाही.’
चौकट===
खडसे, शेट्टींचा पत्ता कट कसा झाला ?
विधान परिषदेच्या बारा आमदारांमधून राजू शेट्टी, एकनाथ खडसे यांचे नाव कट झाल्याची चर्चा कुठून सुरू झाली, याचा शोध आपण घेत असून, यासंदर्भात तीन पक्षांच्या नेत्यांना ठावूक असेल; परंतु शेट्टी, खडसे यांचे नाव कट झाल्याचे माझ्या कानावर अजून आलेले नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.