त्र्यंबकेश्वरला ओबीसी बचाव मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:35 IST2020-12-04T04:35:47+5:302020-12-04T04:35:47+5:30
केंद्रीय पातळीवरील शिक्षण व नोकऱ्या तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणात ओबीसीला २७ टक्के जागा आरक्षित आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का ...

त्र्यंबकेश्वरला ओबीसी बचाव मोर्चा
केंद्रीय पातळीवरील शिक्षण व नोकऱ्या तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणात ओबीसीला २७ टक्के जागा आरक्षित आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करू नये,असे निवेदनात म्हटले आहे. निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर संतोष कदम, नितीन देवरगावकर, गोकुळ बत्तासे, हर्षल भालेराव, समाधान वाकचौरे, सचिन कदम, धनंजय निकम, कपिल देवरगावकर, दिलीप पवार, देवेंद्र कदम, प्रवीण पाटील, किशोर पाटील, पांडुरंग काळे, गणश बारगजे, नारायण दुसाने, धनंजय देवरगावकर, विवेक खैरनार, संजय बागडे, विश्वनाथ कदम, महेंद्र बागडे, सतीश कदम, अमर सोनवणे, संदीप बत्तासे आदी उपस्थित होते. (०२ टीबीके ३)
===Photopath===
021220\02nsk_26_02122020_13.jpg
===Caption===
(०२ टीबीके ३)