भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी एकवटले

By Admin | Updated: September 26, 2016 01:22 IST2016-09-26T01:22:18+5:302016-09-26T01:22:45+5:30

नियोजन बैठक : ३ आॅक्टोबरला निघणार मोर्चा; ओबीसीबांधव होणार सहभागी

OBC accumulated in support of Bhujbal | भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी एकवटले

भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी एकवटले

पंचवटी : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ भुजबळ समर्थक व ओबीसी बांधवांच्या वतीने दि. ३ आॅक्टोबरला तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
औरंगाबादरोडवरील जयशंकर गार्डन येथे भुजबळ यांच्या समर्थनार्थ भुजबळ समर्थक व ओबीसींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सध्या भुजबळ व त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे तुरुंगात आहेत. भुजबळ हे ओबीसी असल्याने त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याचे काम करून शासन ओबीसी नेतृत्व संपविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप बैठकीत अनेक मान्यवरांनी केला. शासनाने भुजबळांवर सूडबुद्धीने कारवाई केली असून, भुजबळांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या बैठकीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे, जि. प. माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, आनंद सोनवणे, बाळासाहेब कर्डक, नगरसेवक समाधान जाधव, संजय साबळे, मधुकर जेजूरकर, शैलेश सूर्यवंशी, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, योगेश घोडे, भालचंद्र भुजबळ, बाजीराव तिडके, रमेश गिते, सचिन दप्तरे, आशा भंदुरे, नाना साबळे, किरण पानकर, आबासाहेब भडांगे, अमोल कालेकर, अरुण काळे, विश्वजित कांबळे, भारत जाधव, रोशन घाटे, विलास पलंगे, आकाश घोलप, शैलेश भागवत, आदिंसह भुजबळ, अनिल महाजन आदि समर्थक उपस्थित होते.
भुजबळ समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी बैठकीत जवळपास १५ लाख रु पये देणग्या जाहीर करण्यात आल्या. देणग्या पाठोपाठ कोणी चारचाकी वाहने, पाण्याचे पाउच, तर कोणी मोर्चासाठी लागणाऱ्या वस्तू देण्याचे जाहीर केले.

Web Title: OBC accumulated in support of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.