ऐ मेरे प्यारे वतन !
By Admin | Updated: August 18, 2016 01:25 IST2016-08-18T01:24:43+5:302016-08-18T01:25:59+5:30
स्वातंत्र्य दिन : शहरात गुंजला भारतमातेचा जयजयकार

ऐ मेरे प्यारे वतन !
औष्णिक वीज केंद्र, एकलहरे
चाडेगाव : एकलहरे वीज औष्णिक केंद्र व शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रात मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वीज निर्मितीचे अभियंता अतुल सोनजे, उपमुख्य अभियंता प्रकाश खंडारे, राजेंद्र खानापूरकर, अधीक्षक अभियंता रूपचंद सोनटक्के, राकेश कमटमकर, मनोहर तायड आदि उपस्थित होते. एकलहरे माध्यमिक विद्यालयात मुख्य अभियंता पंकज सपाटे, एकलहरे जिल्हा परिषद शाळेत माजी सरपंच राजाराम धनवटे, एकलहरे ग्रामपंचायत, प्राथमिक शाळेत सरपंच शंकरराव धनवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच शोभा वैद्य, रामदास डुकरे, बबन राजोळे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.