शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाबंदी केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:16 IST

गोदाकाठ  परिसरात चायना आणि नायलॉन मांज्याचा निर्मितीसह  वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर व विक्री सर्रासपणे सुरू आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमी संतप्त : अनेक दुकानात विक्रीसाठी उपलब्ध 

सायखेडा : गोदाकाठ  परिसरात चायना आणि नायलॉन मांज्याचा निर्मितीसह  वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर व विक्री सर्रासपणे सुरू आहे.चायना मांज्यामुळे राज्यात काही मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पक्षासाठी नायलॉन मांजा हा मृत्यूचा सापळा ठरल्याने त्याच्या  वापरासह विक्रीवर बंदी आली होती. मात्र शहर व  ग्रामीण परिसरात नियमाला धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. नायलॉन मांज्यावर बंदी केवळ कागदावरच का, असा सवाल संतप्त पर्यावरणप्रेमींसह नागरिकांकडून  व्यक्त होत आहे.मनुष्यापासून ते पक्ष्यापर्यंत जीवघेण्या  ठरलेल्या नायलॉन मांज्यावरील बंदी असताना शहरात व ग्रामीण परिसरात सर्रासपणे विक्री व वापर सुरू आहे. नायलॉन मांजा हा पक्ष्यासाठीच नव्हे तर लहान मुले, रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या माणसांना घातक ठरत आहे. दरवर्षी या मांज्यामुळे पाय तुटून निकामी झालेले अक्षरशः झाडाला उलटे लटकून हजारो पक्ष्यांचे प्राण गेले आहेत. नायलॉन मांज्यामुळे पक्ष्यांना जीव गमवावा  लागत असेल तर यावर चिंतन व्हायला हवे. यामुळे मनुष्य जीवाचे आणि मुक्या प्राण्यासह पक्ष्यांचे जीव वाचतील त्यामुळे या मांज्यावर धडकपणे बंदी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नायलॉन मांजा विक्रीवर व वापरावर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण परिसरात पतंगबाजीला उधाण येते. यंदा पतंगबाजीची हौस शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे अधिक भागविताना तरुणाई नजरेस पडत आहेत.अद्याप मकारसंक्रातीला बारा दिवस पुढे असला तरी  शिल्लक असतानाही आकाशात मोठ्या संख्येने पतंग दिवस भर उडतांना नजरेस पडतात. या पतंगबाजीमुळे  आपली पतंग लवकर कापली जाऊ नये यासाठी नायलॉन मांज्याचा वापर केला जात असतो. मात्र हा नायलॉन मांजा  पक्ष्यांसह माणसांच्याही जीवावर बेतू लागला आहे. धडक कारवाई होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी