नायलॉन मांजा विक्रेत्यांचा परवाना होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:45+5:302021-01-08T04:43:45+5:30

नायलॉन मांजाचा वापर पतंगबाजीसाठी करणे बेकायदेशीर असून, ते मानवी जीवीतासह पक्ष्यांच्याही जिवावर बेतणारे ठरते. यामुळे नायलॉन मांजा, काचेच्या मांजाच्या ...

Nylon cat sellers' licenses will be revoked | नायलॉन मांजा विक्रेत्यांचा परवाना होणार रद्द

नायलॉन मांजा विक्रेत्यांचा परवाना होणार रद्द

नायलॉन मांजाचा वापर पतंगबाजीसाठी करणे बेकायदेशीर असून, ते मानवी जीवीतासह पक्ष्यांच्याही जिवावर बेतणारे ठरते. यामुळे नायलॉन मांजा, काचेच्या मांजाच्या विक्रीसह वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. शहरात जर कोठेही चोरट्या मार्गाने नायलॉन मांजा विक्री केला जात असेल, तर त्याबाबतची माहिती थेट पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर द्यावी, असे आवाहनही पाण्डेय यांनी केले. यापुढे नायलॉन मांजा ज्या दुकानदाराकडे आढळून येईल, त्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार असून, शहरातून नायलॉन मांजा पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाण्डेय म्हणाले.

या मांजामुळे आठवडाभरापूर्वीच एका दुचाकीस्वार महिलेला आपला नाहक जीव गमवावा लागला, तसेच वर्षभर शेकडो पक्षी नायलॉनच्या मांजाने जखमी होतात, तर काही मृत्युमुखीही पडतात. यामुळे पर्यावरणाती मोठी हानी होते, हे मोठे दुर्दैव आहे.

नॉयलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द करावेत, अथवा ते निलंबित करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे म्हणाले, तसेच नायलॉन मांजा उत्पादन कोठे होते, त्याचे पुरवठा कोणत्या पद्धतीने व कसा केला जातो, याबाबतही पोलिसांचा तपास सुरू असून, शहरात नायलॉन मांजाचा पुरवठा होणार नाही, या दृष्टीने पुढील ‘तजवीज’ केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Nylon cat sellers' licenses will be revoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.