भरवीर खुर्द येथे पोषण आहार सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:15 IST2021-09-27T04:15:18+5:302021-09-27T04:15:18+5:30
परिसरात लागवड केलेल्या सर्व भाज्यांचे तसेच रानमाळावर, जंगलात उपलब्ध असणाऱ्या विविध भाज्यांचे प्रदर्शन मांडून प्रत्येक भाज्यांचे शरीरास आवश्यक असणारे ...

भरवीर खुर्द येथे पोषण आहार सप्ताह
परिसरात लागवड केलेल्या सर्व भाज्यांचे तसेच रानमाळावर, जंगलात उपलब्ध असणाऱ्या विविध भाज्यांचे प्रदर्शन मांडून प्रत्येक भाज्यांचे शरीरास आवश्यक असणारे महत्त्व पांडुरंग आंबेकर, सुमन क्षीरसागर व निर्मला दिघे यांनी पटवून दिले.
जागतिक ओझोन संरक्षणदिनी ओझोनचे महत्त्व, त्याचे होणारे फायदे याची माहिती वैशाली वालझाडे, कुंदा फणसे, कल्पना खैरनार यांनी दिली. डॉ. जाधव व खैरनार यांनी सकस आहार व त्याचे फायदे याविषयी माहिती दिली. गावातील अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका यांनी किशोरवयीन मुलींशी चर्चा करत त्यावरच्या उपायाबाबत सल्ला दिला. सदर सप्ताहाचे नियोजन मुख्याध्यापक देवरे व सर्व शिक्षक वृंद यांनी केेले.