पोषण आहार घोटाळा; गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: April 4, 2017 01:28 IST2017-04-04T01:28:06+5:302017-04-04T01:28:22+5:30
नाशिक : शालेय पोषण आहार वितरणामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आंबेडकराइट पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

पोषण आहार घोटाळा; गुन्हे दाखल करा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार वितरणामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.३) जिल्हा परिषदेसमोर आंबेडकराइट पार्टी आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्णांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा व संविधानाच्या कलम २१ (क) च्या मूलभूत अधिकाराच्या तरतुदीनुसार ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवून त्यांना शिक्षणाची गोडी लागावी व त्यांना योेग्य तो पोषण आहार मिळून आरोग्य सृदृढ राहावे, यासाठी पोषण आहाराची योजना सुरू आहे. परंतु पोषण आहार योजनेतील धान्य वितरणात अनेक गैरप्रकार असल्याचे संघटनेचे आरोप आहेत. त्यामुळे या पोषण आहार धान्य घोटाळ्यातील दोषींची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आंदोेलनात विलास खरात, पंजाबराव खांडरे, ससाळ, सुनील वाटाणे, अरुण गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)