शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे वाटप
By Admin | Updated: October 9, 2015 22:52 IST2015-10-09T22:51:11+5:302015-10-09T22:52:44+5:30
शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे वाटप

शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे वाटप
नाशिक : प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या आदेशानुसार जागतिक अंडी दिनानिमित्त शुक्रवारी (दि.९) जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये उकडलेल्या अंडीचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली.
३ आॅक्टोबर २०१५ रोजी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त विश्वास भोसले यांनी जागतिक अंडी दिन संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाला पत्र पाठविले होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आॅक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार ९ आॅक्टोबर हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याने राज्यातील कुपोषण कमी करण्याकरिता शालेय पोषण आहारात अंडीचा समावेश करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार ९ आॅक्टोबर रोजी जागतिक अंडी दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अंडी वाटप करण्यात यावीत, असे आदेश जिल्हा परिषदांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक (प्राथमिक) महावीर माने यांनी दिले होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने त्यानुसार कार्यवाही करीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये दुपारच्या पोषण आहारात उकडलेल्या अंडींचे वाटप केल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली. (प्रतिनिधी)