परिचारिका सत्कार सोहळा उत्साहात

By Admin | Updated: May 21, 2014 23:45 IST2014-05-21T23:37:52+5:302014-05-21T23:45:04+5:30

नाशिक : सुवर्ण विश्वकर्मा संस्था, नाशिक जिल्हा नशाबंदी मंच, शिवाम्बू चिकित्सा व संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा मारक येथे परिचारिका सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Nurse Felicitations Fun With Excitement | परिचारिका सत्कार सोहळा उत्साहात

परिचारिका सत्कार सोहळा उत्साहात

नाशिक : सुवर्ण विश्वकर्मा संस्था, नाशिक जिल्हा नशाबंदी मंच, शिवाम्बू चिकित्सा व संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा मारक येथे परिचारिका सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश अहेर व डॉ. श्यामकुमार दुसाने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रताप देशमुख व सूत्रसंचालन रोहन दुसाने यांनी केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना हुदलीकर म्हणाले, परिचारिकांच्या रूपाने समाजात सेवाभाव टिकून आहे. सेवा हे आयुष्याचे कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून काम करणार्‍या परिचारिकांचा सत्कार करणे ही अभिमानाची बाब आहे.
डॉ. दुसाने म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांच्या बरोबरीने काम करणार्‍या परिचारिका कायम उपेक्षित राहिल्या आहेत. त्यांचा सत्कार करणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. याप्रसंगी नूतन कांबळे (संदर्भ सेवा रुग्णालय), मंजुषा परदेशी (गिरणारे), गंगा मस्सी (नेहरूनगर), भाग्यश्री दिवान (दोडी), रजनी बनसोड (इएसआय), साधना कदम (पुणे) यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन कविता ढोले, कल्पना बोरसे, डॉ. रमाकांत जाधव, दीपिका दुसाने आदिंनी केले.

Web Title: Nurse Felicitations Fun With Excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.