परिचारिकांच्या विविध मागण्या प्रलंबित
By Admin | Updated: May 6, 2015 01:59 IST2015-05-06T01:58:38+5:302015-05-06T01:59:33+5:30
परिचारिकांच्या विविध मागण्या प्रलंबित

परिचारिकांच्या विविध मागण्या प्रलंबित
नाशिक : अनेक वर्षांपासून परिचारिकांच्या विविध मागण्या प्रलंबित असून, शासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र गर्व्हेमेंट नर्सेस फेडरेशनच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनतर्फे मंगळवारी (दि़५) सकाळी जिल्हा रुग्णालयासमोर दोन तासांचा लाक्षणिक संप करण्यात आला़ या संपाबाबत त्वरित तोडगा न काढल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
परिचारिकांना दिलेल्या निवेदनात परिचारिकांच्या मासिक भत्ता वाढ करावी, सहाव्या वेतन आयोगानुसार आणि केंद्रीय परिचारिकांप्रमाणे वेतन मिळावे, परिचारिकांच्या कामांचे मूल्यमापन करून योग्य वेतन द्यावे, अनेक ठिकाणी रिक्त पदे असून, ही पदे त्वरित भरावीत, अस्थायी करारबद्ध एऩआऱएच़एममधील परिचारिकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, परिचारिकांच्या सेवेचे खासगीकरण करू नये, रुग्णसेवेसाठी मुबलक कपडे, शिक्षण पर्यवेक्षण आणि मनुष्यबळ यांचा त्वरित पुरवठा करावा, विमा काढावा, विनाकारण बदलीला स्थगिती द्यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत़ जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सकाळी साडेसात ते साडेनऊ यावेळेत पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक संपामध्ये संघटनेच्या अध्यक्ष लता घोडके, कार्याध्यक्ष पूजा पवार, शोभा सोनवणे, शोभा गोसावी, विद्या वाघ, सुनंदा वराडे, विशाल सोनार, प्रशांत सोनार यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या़(प्रतिनिधी)