शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहचला ७९६वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 22:07 IST

मालेगावची करोना बाधीतांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असून यात आज 7 जणांची भर पडली. यामुळे मालेगावचा रुग्णसंख्या 625 इतकी झाली. मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज जिल्ह्यात 11 रूग्ण बरे झाले आहेत.

ठळक मुद्देआज जिल्ह्यात 11 रूग्ण बरे झालेशहराची रुग्णसंख्या ४ ६ इतकी झाली.

नाशिक :  जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून  कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ७९६ वर पोहचला तर शहराची रुग्णसंख्या ४६ इतकी झाली. शुक्रवारी जिल्ह्यात १७ नवे रुग्ण आढळून आले. मालेगावची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६०२ झाली तर नाशिक ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा ९८ वर पोहचला आहे.

जिल्ह्यात मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत असून आज मनमाड, दिंडोरी, निफाड या तालुक्यांतील विविध नव्या गावांमध्ये करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. आज जिल्ह्यात नव्याने 12 रूग्णांची भर पडली आहे. तर रात्रीपासून आतापर्यत 6 जणांचा मृत्यू झाला असून सर्व मालेगाव येथील आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाचे 45 बळी झाले आहेत. तर आज पुन्हा 11 रूग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत 548 करोना रूग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत.मालेगावची करोना बाधीतांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असून यात आज 7 जणांची भर पडली. यामुळे मालेगावचा आकडा ६२५ झाले.  मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज जिल्ह्यात 11 रूग्ण बरे झाले आहेत.आज आढळलेल्या 12 रूग्णांमध्ये मालेगाव येथील 7 तर मनमाड येथील दोन, निफाडच्या विष्णुनगर, कसबे सुकेने येथील 1, सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील 1, रूग्ण आढळून आले आहेत. यासह उर्वरीत जिल्ह्यात 103 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. तर यात जिल्ह्या बाहेरील 30 जणांचा समावेश आहे. यातील 28 जण करोनामुक्त झाले आहेत.दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत 38 हजार 709 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 7 हजार 381 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 6 हजार 322 निगेटिव्ह, 796 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 122 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 268 अहवाल प्रलबिंत आहेत.

शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या अहवालात महापालिका हद्दीतील जुने नाशिक, गोसावीवाडी, नाशिकरोड आणि दसक-पंचक जेलरोड या भागात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशकात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. या दाट लोकवस्तीत कोरोनाने प्रवेश करू नये, असे प्रत्येक नाशिककराला वाटत होते; मात्र सातपूर येथील त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपकर् ात आलेली कुंभारवाड्यात राहणारी एक महिला कोरोनाबाधित आढळून आली.

 

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMalegaonमालेगांव