शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

नव्या स्ट्रेन विषाणूमुळे अधिक दक्षतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 18:49 IST

नाशिक : स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनावरील लक्ष, लसीकरणाची ...

ठळक मुद्देपालकमंत्री: कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

नाशिक : स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनावरील लक्ष, लसीकरणाची मोहीम या महत्त्वाच्या बाबींबरोबरच नव्याने आलेल्या स्ट्रेनसंदर्भतही दक्षता बाळगावी लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात कोरोना आढावा बैठकी प्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस उपाधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.आर. श्रीवास, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ.आवेश पलोड, तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव हा जलद गतीने होत असल्याने, ब्रिटन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे. परदेशातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांपैकी कुणी प्रवासी, जर नाशिकला येत असेल, अशा प्रवाशांची माहिती नाशिक प्रशासनाला कळविण्यात यावी, असे मुंबई प्रशासनास सांगण्यात आले असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले.येत्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. त्यामुळे फक्त शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर सुरू ठेवण्यात येऊन शाळा, महाविद्यालये व खासगी ठिकाणी सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर्स बंद करण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक