शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

कुशल चोपडा दुहेरी मुकुटाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 18:27 IST

बाबा बोकील टेबल टेनिस : मुलींमध्ये सायली बक्षी विजेती नाशिक : गंगापूररोड येथील शिवसत्य क्रीडा मंडळाच्या वतीने आणि नाशिक ...

बाबा बोकील टेबल टेनिस : मुलींमध्ये सायली बक्षी विजेतीनाशिक : गंगापूररोड येथील शिवसत्य क्रीडा मंडळाच्या वतीने आणि नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या सहकार्याने ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक तथा संघटक कै. बाबा बोकील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अकराव्या टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा हा दुहेरी मुकुटाचा मानकरी ठरला.चोपडाने कॅडेट आणि सब ज्युनियर गटाचे विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट पटकावला, तर कॅडेट मुलीमध्ये सायली बक्षी, सबज्युनियर मुलीमध्ये सायली वाणी, तर पुरुष गटात सौमित देशपांडेने यांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळविले.कॅडेट मुलामध्ये चोपडाने अंतिम लढतीत पीयूष जाधवला ०८-११, ११-०७, ११-०४ आणि ११-०३ अशा ३-१ फरकाने असे पराभूत करून विजेतेपद मिळविले, तर सबज्युनियर गटातही या दोघांमध्येच अंतिम लढत झाली. यामध्येही कुशल चोपडाने पीयूष जाधवला ०८-११, ११-०७, ११-०४ आणि ११-०३ असा सरळ ३-१ पराभूत करून दुहेरी यश संपादन केले.कॅडेट मुलीच्या अंतिम सामन्यात सायली बक्षी हिने फोर हॅण्ड टॉप स्पीनचा सुंदर वापर करत निताली पूरकर हिचा ११-०३, ११-०४ आणि ११-०९ असा सरळ पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळविले. मुलीच्या सबज्युनियर गटाचा सामना फारच रंगतदार झाला. या गटाची अंतिम लढत तनिषा कोटेचा आणि सायली वाणी या दोन राष्ट्रीय खेळाडूमध्ये झाली. या सामन्यात सायली वाणी हिने बॅक हॅण्ड ब्लॉकिंगचा सुंदर वापर करीत पहिला सेट ११ विरु द्ध ०७, तर दुसरा सेट ११-०९ असा असा जिंकून आघाडी मिळविली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये तनिषाने संयमाने खेळ करून चांगली लढत दिली. या सेटमध्ये ११-११ अशा बरोबरीनंतर तनिषाने हा सेट १५-१३ असा जिंकून आपले आव्हान कायम राखले.चौथ्या सेटमध्ये सायली वाणीने आपल्या फोर हॅण्डच्या जोरावर हा सेट ११-०८ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या गटातील सौमित देशपांडे आणि ओंकार जोग यांच्यातील अंतिम सामनाही चांगलाच अटीतटीचा झाला. हा सामना पाच सेटपर्यंत लांबला. राष्ट्रीय खेळाडू सौमित देशपांडेने पाहिले दोन सेट ११-०८ आणि ११-०८ असे जिंकून आघाडी मिळविली. परंतु त्यानंतर ओंकार जोगने मुसंडी मारून तिसरा आणि चौथा सेट ११-०५ आणि ११-०२ असा जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. या बरोबरीनंतर झालेल्या निर्णायक पाचव्या सेटमध्ये सौमित देशपांडेने ११-०७ असा जिंकून या गटाचे विजेतेपद पटकावले.

टॅग्स :NashikनाशिकTable Tennisटेबल टेनिस