शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचा खर्च उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:59 IST

नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.

ठळक मुद्देसमता ज्येष्ठ नागरिक संघचा अभिनव उपक्रम ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.आदिवासी भागातील मुलांचे शिक्षण अनेविध कारणांमुळे अपुर्ण राहाते. त्यांच्यात चांगली गुणवत्ता असूनही त्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे देखील कित्येकदा शिक्षण सोडण्याची वेळ येते. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडू नये तसेच दहावीचे महत्वाचे वर्ष लक्षात घेऊन समता ज्येष्ठ नागरिक संघाने पांजरे येथील नुतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील ५५ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी घेतली आहे.पखालरोडवरील समता ज्येष्ठ नागरिक संघाकडून राबविण्यात येणाºय अनेक सामाजिक कार्यात शिक्षणाला अग्रक्रम असून यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून मदतीचा हात पुढे केला जातो. अकोले तालुक्यातील पांजरे येथील जिल्हा परिषदेचय प्राथमिक शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक संघाकडून शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम ठाकूर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डी.एफ. मोरे, सचिव दिनानाथ पाटील, बळवंत शिर्के, शांताराम पोटे, आर.एस. गरूड, चिंतामण अहेर, कृषी अधिकारी व्ही. आर. बांंबळे, मुख्याध्यापक पी.वाय. लांडगे, सौ. सुमन देशमुख उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक