शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

केटीएचएम महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:52 IST

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, ...

ठळक मुद्देचर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांची नोंदणी

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, आयुष्याची गुणवत्ता, लिंगभेद, विकास निर्देशांक, यांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली असून, सामाजिक सौररचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रुती तांबे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व केटीएचएम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आयोजित दोन दिवसीय ‘रिथनिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड डिस्प्लेसमेंट आॅफ इंडिया’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर माजी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. बी. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय सावळे उपस्थित होते.डॉ. तांबे म्हणाल्या की, समाजशास्त्र विकासाचा अभ्यास पुरेशा गांभीर्याने केला का? असे विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. आर. बी. पाटील म्हणाले, भारतामध्ये प्रामुख्याने खाणी, खासगी उद्योग, अभयारण्ये, धरणे यामुळे विस्थापितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याचा परिणाम आदिवासींवर याचा परिणाम आदिवासींवर होतो. पुनर्वसनासंदर्भात कायदे असून, त्याचा योग्य तो वापर होत नाही त्यामुळे पुनर्वसित नागरिकांना सुविधा मिळत नाही वारणा व कोयना धरण हे याबाबतचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.दिल्ली विद्यापीठ समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. नंदिनी सुंदर यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये विस्थापित होणाऱ्यांमध्ये गरीब मोठ्या प्रमाणावर असतात. विस्थापित झाल्यावर सामाजिक संरचना बदलते त्यामुळे असमानता निर्माण होते. नाते-संबंधामध्ये दरी निर्माण होत. लोकांमध्ये एकतेची भावना राहत नाही; याचा परिणाम समाज संरचनेवर होतो, असे त्यांनी सांगितले.सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समृद्धी महामार्ग या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होणार आहेत. याला तुम्ही विकास म्हणू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून लोकांनी संघटित होऊन याला विरोध करणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी मांडले. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला.प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. संजय सावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.तुषार पाटील यांनी, तर आभार प्रा. डी. एच. शिंदे यांनी मानले. यावेळी प्रा. उमेश शिंदे, प्रा.शशिकांत माळोदे यांनी परिश्रम घेतले. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांनी नोंदणी केली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र