नाशिक : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात असली तरी नाशिकमध्ये मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या चोवीस तासांत इगतपुरी आणि पेठ तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस झाला. नाशिकसह मध्य महाराष्टÑात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असताना नाशिकवर अजूनही पावसाची अपेक्षित कृपा बरसलेली नाही. धरणक्षेत्रात पाऊस होत नसल्याचे नाशिककरांची चिंता कायम आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने पावसाने जोर धरला, असे वाटत होते. मध्यंतरही शहरासह काही तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले होते. परंतु आता पावसाचा जोर कमी झाला असून, इगतपुरी आणि पेठ वगळता जिल्ह्यात पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही. गेल्या चोवीस तासांत इगतपुरीत ७४ तर पेठ तालुक्यात ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्र्यंबकमध्ये पावसाची रिमझिम कायम होती. मात्र सदर तीन तालुके वगळता अन्यत्र पाऊस जाणवला नाही. नाशिक तालुक्यात रविवारी १३.३ मि.मी. पाऊस पडला. शहरासह अन्य भागात पावसाच्या किरकोळ सरी सुरू होत्या.सिन्नर, येवला आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये अगदी चार ते पाच मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला.
इगतपुरी, पेठ वगळता अन्य तालुके कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 16:59 IST
नाशिक : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात असली तरी नाशिकमध्ये मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम ...
इगतपुरी, पेठ वगळता अन्य तालुके कोरडेच
ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : गेल्या चोवीस तासांत केवळ ९.९ मिमी पाऊस