एनआरएमयुचे रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:29 IST2020-08-09T21:36:23+5:302020-08-10T00:29:33+5:30

मनमाड : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात रेल्वे संघटना रस्त्यावर उतरल्या असून रविवारी क्र ांती दिनानिमित्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे कामगारांनी मनमाड रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करत तीव्र निदर्शने केले.

NRMU's bear movement at the railway station | एनआरएमयुचे रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन

एनआरएमयुचे रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन

ठळक मुद्देकेंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मनमाड : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात रेल्वे संघटना रस्त्यावर उतरल्या असून रविवारी क्र ांती दिनानिमित्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे कामगारांनी मनमाड रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करत तीव्र निदर्शने केले.
यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे खासगीकरण करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करीत क्र ांती दिन तसेच संघर्ष दिनाचे औचित्य साधून नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाने रेल्वेचे खासगीकरण करू नये, अन्यथा रेल कामगार संघटना चक्का जाम आंदोलन करेल, असे सांगण्यात आले.
यावेळी कॉ. अंबादास निकम, शबरीश नायर, हेमंत डोंगरे, रमेश केदारे, सचिन काकड, संदीप सोनवणे, भाऊराज आंधळे, सुनील गडवे, शांताराम गरु ड, चेतन आहिरे, आंनद भारस्कर, मिलिंद लिहिणार, नंदा चौधरी, कुसुम पोहाल, सरला केदारे, कमल पवार यांच्यासह कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: NRMU's bear movement at the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.