शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांना आता प्रभाग समित्यांवर नियुक्तीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:27 IST

महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती न झाल्याने निराश झालेल्या कार्यकर्त्यांना आता सहाही प्रभाग समित्यांवर देण्यात येणाºया प्रत्येकी दोन जागांवर नियुक्तीचे वेध लागले आहेत. सत्ताधारी भाजपाने त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देप्रत्येकी दोन जागांवर नियुक्तीचे वेधसत्ताधारी भाजपाने त्यादृष्टीने चाचपणी नाराज कार्यकर्त्यांना प्रभाग समित्यांवर सामावून घेण्याचे प्रयत्न

नाशिक : महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती न झाल्याने निराश झालेल्या कार्यकर्त्यांना आता सहाही प्रभाग समित्यांवर देण्यात येणाºया प्रत्येकी दोन जागांवर नियुक्तीचे वेध लागले आहेत. सत्ताधारी भाजपाने त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.  महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा महापौरांनी गेल्या महासभेत केली. भाजपाने पक्ष पदाधिकाºयांच्याच पारड्यात आपले वजन टाकल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच महिला वर्गात तर कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.  सत्ताधारी भाजपाने आता स्वीकृतचा विषय संपवल्यानंतर सहाही प्रभाग समित्यांवर नामनिर्देशित करावयाच्या प्रत्येक दोन सदस्यांच्या नियुक्तीबाबत चाचपणी चालविली आहे. महाराष्टÑ महापालिका अधिनियमानुसार प्रभाग समित्यांवर शहरातील प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित प्रतिनिधींची प्रभाग सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे. परंतु, महापालिकेत आजवर या तरतुदीचे पालन करण्यात आलेले नाही. भाजपा सत्तेत आल्यानंतर मात्र, प्रभाग समित्यांवर प्रत्येकी दोन सदस्य नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. आता स्वीकृत सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया आटोपल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांना प्रभाग समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून सामावून घेण्याचे प्रयत्न भाजपाने चालविले असून, त्यादृष्टीने विभागनिहाय चाचपणी चालविली आहे. प्रभागवर कार्यकर्त्यांनाच संधी देण्याची तयारी पक्षाच्या पदाधिकाºयांनी दर्शविली आहे. डिसेंबर महिन्यात त्याबाबतचा अधिकृत कार्यक्रम नगरसचिव विभागामार्फत घोषित होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाच्याही हालचाली सत्ताधारी भाजपाने शिक्षण समितीऐवजी पुन्हा शिक्षण मंडळ गठित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. शिक्षण समितीला फारसे अधिकार नसल्याने भाजपाने पूर्वीप्रमाणेच मंडळाची मागणी केलेली आहे. शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याने भाजपाने अद्याप शिक्षण समितीची रचना केलेली नाही. आता स्वीकृतच्या निवडीनंतर शिक्षण मंडळासाठी शासनस्तरावर कायद्यात बदल करण्यासंबंधी पाठपुरावा केला जात असून, तसे झाल्यास नगरसेवकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्यावर संधी मिळणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक