शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...आता नाशिकच्या विमानतळावरुन होणार 'हज' यात्रेसाठी उड्डाण; उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 15:31 IST

ओझर विमानतळावरून हज उड्डाण सुरु करण्यासाठी ओझर विमानतळ सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधांनी सुसज्ज असल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. याबाबतचा अहवालदेखील एचएएल ओझर विमानतळ प्रशासनाने केंद्राच्या नागरी उडाण मंत्रालयाला पाठविला आहे.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाला दिलासा'एचएएल'ची सकारात्मकता

नाशिक :मुस्लीम समुदायाकडून दरवर्षी 'हज-उमराह'च्या पवित्र धार्मिक यात्रा सौदी अरेबियाच्या 'मक्का-मदिना' शहरांमध्ये केली जाते. उत्तर महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे बारा ते पंधरा हजार मुस्लीम यात्रेकरु यात्रेसाठी रवाना होतात. नाशिकच्या ओझर विमानतळावरुन या यात्रेकरिता विमानांच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा झाल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. एचएएल व डीजीसीएकडूनदेखील याबाबत सर्व परवानगी प्रक्रीया पुर्ण झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमधील मुस्लीम समुदायालासुद्धा हज यात्रेकरिता नाशिकमार्गे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठावे लागते. यामुळे प्रवासाचा वेळ, खर्चदेखील वाढून गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. ओझर विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून समुदायाकडून हज, उमराह या धार्मिक यात्रेकरिता थेट सौदीअरेबियासाठी विमानसेवा सुरु व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली होती. याबाबत गोडसे यांची समाजातील काही धर्मगुरुंनी भेट घेऊन निवेदनही दिले होते. राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक आणि अल्पसंख्यांक विभागाच्या सचिव जयश्री मुखर्जी यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळे दोन महिन्यांपूर्वीच हज टर्मिनलच्या यादीत ओझर विमानतळाचा समावेश व्हावा अशी शिफारस राज्याने केंद्राकडे केली होती. ओझर विमानतळाचा 'हज टर्मिनल'च्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शविली, असे गोडसे यांनी यावेळी सांगितले. यामुळे संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील हज यात्रेचा प्रारंभ होईपर्यंत ओझर विमानतळाचा टर्मिनलच्या यादीत समावेश झालेला असेल आणि येथून सौदीच्या दिशेने विमाने यात्रेकरुंना घेऊन उड्डाण करतील असा विश्वास गोडसे यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Haj yatraहज यात्राNashikनाशिकHemant Godseहेमंत गोडसेMuslimमुस्लीमsaudi arabiaसौदी अरेबिया