...आता विना हेल्मेटधारक दुचाकीस्वारांची होणार धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:26+5:302021-09-05T04:19:26+5:30
दरम्यान, शहरातील रस्त्यांवर हेल्मेटधारक दुचाकीस्वारांची संख्या वाढावी, यासाठी पाण्डेय यांनी शनिवारी महत्त्वाचा निर्णय घेत हे अभियान अधिक प्रभावी करण्याकरिता ...

...आता विना हेल्मेटधारक दुचाकीस्वारांची होणार धरपकड
दरम्यान, शहरातील रस्त्यांवर हेल्मेटधारक दुचाकीस्वारांची संख्या वाढावी, यासाठी पाण्डेय यांनी शनिवारी महत्त्वाचा निर्णय घेत हे अभियान अधिक प्रभावी करण्याकरिता शहर वाहतूक शाखा युनिटनिहाय भरारी पथके तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
--इन्फो
प्रमुख चौकांमध्ये होणार नाकाबंदी
भरारी पथकांकडून शहरातील प्रमुख चौकांमध्ये बॅरिकेडिंग टाकून नाकाबंदी केली जाणार आहे. याअंतर्गत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार स्त्री-पुरुषांना ताब्यात घेतले जाणार आहे. त्यांना पोलीस वाहनात बसवून थेट समुपदेशन केंद्रावर नेऊन दोन तासांकरिता समुपदेशन वर्गात हजेरी देणे बंधनकारक राहणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सिताराम गायकवाड यांनी सांगितले.
--इन्फो--
समुपदेशनाचे मिळणार प्रमाणपत्र
समुपदेशनाला हजेरी लावल्यानंतर संबंधित दुचाकीस्वाराला प्रमाणपत्र पोलिसांकडून दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दुचाकी वाहन पुन्हा मिळविण्यासाठी त्याला उपयोगी पडणार आहे. जप्त केलेली दुचाकी प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच पोलिसांकडून पुन्हा मिळविता येणार आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचा दंड पोलिसांकडे भरावा लागणार नाही, हे आयुक्तालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
--कोट--
दुचाकीस्वारांनी आपल्या जीवनाचे महत्त्व लक्षात घ्यावे. आपल्या कुटुंबासाठी आपण किती आवश्यक आहोत, हे पालकांना एकदा विचारावे. त्यामुळे घरातून बाहेर पडताच हेल्मेट डोक्यात घालून दुचाकीवरस्वार व्हावे, अन्यथा समुपदेशन केंद्राला हजेरी ही बंधनकारक असून तसा शासनाचा अध्यादेश आहे, हे लक्षात घ्यावे.
-दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त