शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

राष्ट्रवादी काँग्रसचे आता ‘मिशन विधानसभा’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज करणार चाचपणी

By suyog.joshi | Updated: July 23, 2024 10:57 IST

मेळावा झाल्यानंतर जयंत पाटील पंधराही विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

नाशिक (सुयोग जोशी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षानेही तयारी सुरू केली असून पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळ्वारी (दि. २३) औरंगाबाद रोडवरील जेजुरकर मळयातील जय शंकर फेस्टिव्हल लॉन्समध्ये जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे.

मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी गजानन शेलार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. दोन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या असून त्याकरिता पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. मेळावा झाल्यानंतर जयंत पाटील पंधराही विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी क्रमवारी ठरवली असून नाशिक पूर्व विधानसभेतील पदाधिकाऱ्यांसमवेत प्रदेशाध्यक्ष पाटील चर्चा करतील. त्यानंतर नाशिक पश्चिम, मध्य, देवळाली, सिन्नर, दिंडोरी-पेठ, कळ्वण-सुरगाणा, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, नांदगाव, येवला, बागलाण, चांदवड-देवळा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, निफाड या मतदारसंघांतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. मेळाव्यास प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्त्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड आदींसह जिल्हयातील सर्व तालुकाध्यक्ष, कार्यध्यक्ष, शहरातील विभागीय अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, युवक तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष, कार्याध्यक्ष आदींसह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस