‘पीएफ’साठी आता व्यवस्थापनाच्या स्वाक्षरीची गरज अनावश्यक
By Admin | Updated: December 5, 2015 22:39 IST2015-12-05T22:38:20+5:302015-12-05T22:39:11+5:30
‘पीएफ’साठी आता व्यवस्थापनाच्या स्वाक्षरीची गरज अनावश्यक

‘पीएफ’साठी आता व्यवस्थापनाच्या स्वाक्षरीची गरज अनावश्यक
सातपूर : यूएएन (संयुक्त खाते क्रमांक) कार्यान्वित करणाऱ्या सभासदांना आपले दावे दाखल करण्यासाठी यापुढे व्यवस्थापनाच्या स्वाक्षरीची आवश्यकता नसल्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ च्या कलम ७८ मध्ये दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून निर्देश जारी केले आहेत की, ज्या कर्मचाऱ्यांनी आपला यूएएन
क्र मांक कार्यान्वित केला आहे. तसेच आधार क्रमांक आणि बँक खाते संख्या याची माहिती जोडली आहे, अशा सभासदांनी आपला अर्ज
क्रमांक १९, अर्ज क्रमांक १0 सी, अर्ज क्रमांक ३१ नियोक्ताच्या साक्षांकनाशिवाय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे दाखल करायचे आहेत.
या निर्देशांच्या प्रभावात केंद्रीय भविष्य निधी आयुक्तांनी भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ च्या कलम ७८ मध्ये भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ च्या कलम ७२ (५) मध्ये दिलेल्या अधिकारांचा उपयोग करत नवीन अर्ज क्र मांक १९, अर्ज
क्रमांक १0सी, अर्ज क्रमांक ३१ निर्देशित केले आहेत. हे दावे केवळ तेच कर्मचारी वापरू शकतील ज्यांचे अर्ज क्रमांक ११ (नवीन) दाखल आहेत, ज्यांचे यूएएन क्रमांक कार्यान्वित आहेत आणि ज्यांचे यूएएन क्रमांक, आधार नंबर व बँक खाता क्रमांकाच्या माहितीसह नियोक्ताच्या डिजिटल सिग्नेचरने परिपूर्ण आहेत. अन्य कर्मचारी जुन्या अर्जाचा प्रयोग करत राहतील. नवीन अर्जाचा नमुना वेबसाइट तसेच फेसबुक पोस्टबरोबर फोटो अर्जामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या धोरणात्मक निर्णयानुसार यापुढे सभासदांना व्यवस्थापनाकडे अथवा आस्थापनाकडे (नियोक्ताकडे) स्वाक्षरीसाठी जाण्याची आवश्यकता राहणार नाही. थेट भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे आपले दावे दाखल करू शकतील आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयदेखील नियमात बसणारे दावे निकाली काढू शकतील. (वार्ताहर)