बसथांब्यांसाठी आता शोधला दुसरा ठेकेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:13+5:302021-02-05T05:42:13+5:30
नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने २६ जानेवारीपासून बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव हाेता. मात्र, राज्य शासनाच्या परिवहन मंत्रालयाने बस ऑपरेशनसाठी ...

बसथांब्यांसाठी आता शोधला दुसरा ठेकेदार
नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने २६ जानेवारीपासून बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव हाेता. मात्र, राज्य शासनाच्या परिवहन मंत्रालयाने बस ऑपरेशनसाठी लागणारा परवानाच वेळेत दिला नाही. त्यातच शहरात ७६२ बसथांबे पीपीपीअंतर्गत बांधणाऱ्या ठेकेदारानेदेखील माघार घेतली. शहरात बसथांबे तयार करून त्यावर येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून संबंधित ठेकेदार भांडवली गुंतवणूक आणि उत्पन्न मिळवेल. परंतु, त्याचबरोबर नाशिक महापालिकेला वर्षाकाठी ६३ लाख रुपये संबंधित ठेकेदार देणार होता. परंतु, काेरोनाकाळामुळे अडचणी आल्याचे निमित्त करून या ठेकेदाराने महापालिकेकडे मुदतवाढ मागितली. बससेवा सुरू होत असल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी ठेकेदार कंपनीची मागणी मान्य केली नाही. फारतर टप्प्याटप्प्याने बस शेल्टर बांधण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, ठेकेदाराने नकार दिला. आता दुसऱ्या न्यूनतम देकार देणाऱ्यास काम देण्यात आले असून या ठेकेदाराने अगोदरच्या ठेकेदारापेक्षा २५ हजार अधिक म्हणजेच ६३ लाख २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविल्याने आता या ठेकेदारास काम देण्याचा प्रस्ताव प्रशासन शुक्रवारी (दि.२९) स्थायी समितीवर सादर करणार आहे.