नाशिकरोड कारागृह घेणार आता होमगार्ड्सची मदत
By Admin | Updated: July 21, 2014 01:31 IST2014-07-21T01:30:02+5:302014-07-21T01:31:11+5:30
नाशिकरोड कारागृह घेणार आता होमगार्ड्सची मदत

नाशिकरोड कारागृह घेणार आता होमगार्ड्सची मदत
नाशिक : कारागृहात सुमारे ७० सुरक्षारक्षक कमी असल्याने आणि भरतीला परवानगी मिळत नसल्याने कारागृहातील बंदोबस्तावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे कारागृहाने आता होमगाडर््सची मदत घेण्याचे ठरविले असून, राज्य प्रशासनाला याबाबतचे पत्रही दिले आहे. दरम्यान, हा धोरणात्मक निर्णय असल्याने होमगाडर््सची मदत लागलीच मिळणेही कठीण आहे.
कारागृहात नियमित होणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी नाशिकरोड कारागृहाला नेहमीच टीकेला सामोरे जावे लागत असते. कारागृहाला मंजूर असलेल्या सुरक्षारक्षकांची संख्या आणि प्रत्यक्षात असलेले मनुष्यबळ पाहता कारागृहातील बंदोबस्तावर परिणाम होत आहे. तीन शिफ्टमध्ये बंदोबस्ताचे काम चालते, त्यामुळे असलेल्या मनुष्यबळामध्ये बंदोबस्त राखण्यासाठी कारागृहावर ताण येत आहे.
कारागृह प्रशासनावर नियमित प्रशासकीय कामांचा ताण असतोच, शिवाय कैद्यांच्या कल्याणार्थ उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यावरही लक्ष केंद्रित करावे लागते. एवढे करून संपूर्ण बंदोबस्त आणि सुरक्षेची जबाबदारीदेखील कारागृह प्रशासनावर येते.
सुमारे अडीच हजार कैदी असलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवणे कठीण असल्याने होमगाडर््सची मदत घेण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)