आता फेरीवाल्यांचेही व्यवहार होणार कॅशलेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:35+5:302021-02-05T05:42:35+5:30
नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहार वाढल असून, तो अधिकृत मार्गाने हेात आहे. त्याचबरोबर व्यवहारात सुलभतादेखील आहे. केंद्र शासनाने गेल्याच वर्षी पीएम ...

आता फेरीवाल्यांचेही व्यवहार होणार कॅशलेस
नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहार वाढल असून, तो अधिकृत मार्गाने हेात आहे. त्याचबरोबर व्यवहारात सुलभतादेखील आहे. केंद्र शासनाने गेल्याच वर्षी पीएम स्वनिधी ही योजना गेल्या वर्षी सुरू केली. यात ६ हजार ९०१ फेरीवाल्यांना स्वनिधी पुरवण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५ हजार २४३ जणांना बँकेमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांची माहिती देण्यासाठी मै भी डिजिटल हा कार्यक्रम घेण्यात आला. पंचवटीत बँक ऑफ महाराष्ट्र वतीने घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराप्रसंगी महापालिकेच्या उपआयुक्त करुणा डहाळे, बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक तथा महाप्रबंधक एन. एस. देशपांडे, पंचवटी शाखेचे मुख्य प्रबंधक संदीप पोटे, तसेच कर्ज वितरित झालेले सर्व पथविक्रेते लाभार्थी उपस्थित होते.
जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अर्धेंदु शेखर, तसेच कश्यप पाटील यांनी डिजिटल व्यवहाराबाबत मार्गदर्शन केले व क्युआर कोड देऊन ते वापरण्यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले. सोबतच कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना याबाबत प्रोत्साहित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
इन्फो...
मनपाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांनी स्वनिधीसे समृद्धी या योजनेबाबत माहिती दिली व शासनाच्या विविध आठ योजनेचा लाभ कर्ज मिळालेल्या सर्व पथविक्रेत्यांनी मनपा विभागीय कार्यालय येथे ऑनलाईन फॉर्म भरावेत व मिळालेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरून सात टक्के व्याजाचा व डिजिटल व्यवहार करून मासिक कॅशबँकचा लाभ सर्व पथविक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.