शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

आता द्राक्षांची दैना !

By किरण अग्रवाल | Updated: December 23, 2018 01:26 IST

कांद्याचा वांधा पूर्णत: अथवा समाधानकारकरीत्या संपला नसताना आता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ आली असून, द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाल्याने नवीनच संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देआता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ हा फेरा खरेच शेतकरीवर्गाच्या सहनशीलतेचा अंत पाहणाराच

कांद्याचा वांधा पूर्णत: अथवा समाधानकारकरीत्या संपला नसताना आता द्राक्षे ‘आंबट’ होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये शेकोट्या पेटविण्याची वेळ आली असून, द्राक्षमण्यांना तडे जाण्याची भीती निर्माण झाल्याने नवीनच संकट उभे ठाकले आहे.निसर्ग कधी कधी अशी काही परीक्षा घेतो की, मनुष्याला कोलमडून पडण्याखेरीज गत्यंतर उतर नाही. यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवली, त्यामुळे अगोदरच बळीराजा संकटग्रस्त ठरला आहे. त्यात कांदा गडगडला. त्यासंदर्भात आंदोलने घडून आल्याने राज्य शासनाकडून अल्पसे का होईना दोनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान घोषित केले गेले. ते पुरेसे नाहीच; पण बुडत्याला काडीचा आधार म्हणून त्याकडे पाहता यावे. या ससेहोलपटीतून कांदा उत्पादक उसासा घेत नाही तोच द्राक्षे उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली असून, निफाड तालुक्यात तर पारा ६.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. याच तालुक्यात द्राक्ष उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. रब्बीच्या गहू, हरभरा, कांदा पिकासाठी ही थंडी लाभदायी ठरणारी असली तरी द्राक्षांसाठी मात्र धोकादायक आहे. कारण, त्यामुळे द्राक्षमणींची फुगवण होऊन साखरेचा उतारा कमी होईल. अशाने मणी तडकण्याचाही धोका आहे. शिवाय, थंडीमुळे भुरी रोगाचा प्रादुर्भावही घडून येत असतो. याच्या परिणामी द्राक्ष उत्पादनात घट होईल, तसेच प्रतही घसरेल जी निर्यातीकरिता अडचणीची ठरेल. निर्यातीकरिताच्या द्राक्ष उत्पादनासाठी यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील २७ हजारांहून अधिक प्लॉट्सची नोंदणी कृषी खात्याकडे झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ती गेल्यावर्षी झाली होती तेवढी म्हणजे ३० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. द्राक्ष निर्यातीकडे वाढलेला कल व त्यातून फिरणारे अर्थकारण याची प्रचिती यातून यावी. परंतु थंडीतली वाढ कायम राहिल्यास द्राक्षांना फटका बसून उत्पादन व निर्यात अशा पुढील साऱ्या प्रक्रियेवर परिणाम घडून येईल. निसर्ग व नशिबाचा हा फेरा खरेच शेतकरीवर्गाच्या सहनशीलतेचा अंत पाहणाराच आहे. निसर्गाचे बिघडलेले ताळतंत्र पाहता शाश्वत शेती हाच यावरील उपाय ठरावा; परंतु त्याकडे वळण्यापूर्वी असे वा इतके फटके सोसणे अवघड ठरले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीTemperatureतापमानenvironmentवातावरण