शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

आता शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

By admin | Updated: July 9, 2017 00:09 IST

नाशिक : जमिनीचे दर जाहीर केल्याने आता त्यावर शेतकरी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरू पाहणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे दर अखेर प्रशासनाने जाहीर केल्याने आता त्यावर शेतकरी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसने समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला असल्यामुळे त्यांची भूमिकाही यात महत्त्वाची मानली जात असून, याप्रश्नी अगोदरपासून आग्रही असलेल्या किसान सभेने तातडीने बैठक घेऊन विरोध जाहीर केला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतून जात असून, या दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांनी महामार्गाची घोषणा झाल्यापासून आपला विरोध कायम ठेवला आहे. इगतपुरी तालुक्यात आजवर धरणे, तलाव, रेल्वे यासाठी वेळोवेळी जमिनी संपादित झाल्याने शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी जागा नसल्याची भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली, तर सिन्नर तालुक्यातही पंचतारांकित औद्योगिक वसाहत, रतन इंडिया बुल, माळेगाव औद्योगिक वसाहत, नाशिक-पुणे महामार्गासाठी जागा संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा समृद्धी महामार्गासाठी जागा घेऊन सरकार शेतकऱ्यांना भूमिहीन करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे समृद्धीसाठी जमिनीची मोजणी करू देण्यासच जागामालकांनी विरोध दर्शविला, प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच ड्रोनचा वापर करून मोजणीचा प्रयत्न केला असता त्यालाही नकार देण्यात आला. जागामालक शेतकऱ्यांची समजूत काढून प्रशासनाने जागेची मोजणी केली असली तरी, सिन्नर तालुक्यातील शिवडे, मऱ्हळ, पाथरे, घोरवड, डुबेरे व वारेगाव या सहा गावांमध्ये अद्याप मोजणी होऊ शकलेली नाही. समृद्धी महामार्गासाठी राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये विरोध होत असताना शासनाने सदरचा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवून ठिकठिकाणी जागा खरेदीचे दर जाहीर केले आहेत. नाशिक जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यांमध्ये सरसकट शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही, मात्र नाशिक जिल्ह्यातील दोन्ही तालुक्यांतील ४८ गावांमधील शेतकरी जागा देण्यास अनुत्सुक आहेत अशात प्रशासनाने हेक्टरी भाव जाहीर करून शेतकऱ्यांना जादा रकमेचे आमिष दाखवून भुलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यास आता शेतकरी कितपत प्रतिसाद देतील त्यावरच या महामार्गाचे भवितव्य अवलंबून असले तरी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मते या महामार्गासाठी जमीन न मिळाल्यास भूसंपादन कायद्याचा वापर करून सक्तीने जमिनी ताब्यात घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.