आता तर प्लाझ्माचादेखील काळाबाजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:05+5:302021-04-30T04:18:05+5:30
नाशिक : कोरोनाने थैमान घातलेले असताना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष आणि काळ्या बाजाराचा सामना करावा लागत ...

आता तर प्लाझ्माचादेखील काळाबाजार!
नाशिक : कोरोनाने थैमान घातलेले असताना रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष आणि काळ्या बाजाराचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या अनुपलब्धतेमुळे त्यांचा काळाबाजार सुरुच असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने सर्व रक्तपेढ्यांना प्लाझ्मा ५,५०० रुपयांना उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिलेले असतानाही काही ठिकाणी प्लाझ्मा ८,५०० तर काही ठिकाणी १० ते ११ हजारांच्या दराने मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
ज्या गंभीर रुग्णांना कोरोनावरील नियमित गोळ्या किंवा रेमडेसिविरनेदेखील फारसा फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनाच सामान्यपणे प्लाझ्मा दिला जाताे. हा प्लाझ्मादेखील ज्या व्यक्तीला कोरोना होऊन एक-दीड महिन्यांहून अधिक कालावधी झालेला असेल, अशा दात्यांकडून घेतला जातो. या दात्यांकडून मिळालेल्या रक्ताच्या सर्वप्रकारच्या चाचण्या करुन प्लाझ्मा घेतला जातो.