शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नाशकात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता चार्जिंग स्टेशन

By suyog.joshi | Updated: September 8, 2023 18:38 IST

सहा कंपन्या रेसमध्ये : फेरनिविदांची तांत्रिक तपासणी

नाशिक (सुयोग जोशी) : इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका यांत्रिकी विभागाने पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राबविलेल्या फेरनिविदेत सहा कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असून या निविदा खुल्या करून त्यांची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. त्यात कंपन्या पात्र ठरल्या नाहीतर पुन्हा फेरनिविदा काढाव्या लागेल.

मागील वेळेस निविदा प्रक्रियेतील सातही कंपन्या तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्या होत्या. शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीतून खरेदी केली जाणारी वाहने इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. याकरिता इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देताना जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी दिल्ली येथील यूएनडीपीने देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात नाशिक महापालिकेचा समावेश असून शहर हद्दीत तब्बल १०६ चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात वीस ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मागील एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यात प्रारंभी टाटा, रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते; पण नंतर त्यांनी माघार घेतली. पहिल्या निविदा प्रक्रियेत सात कंपन्या सहभागी झाल्या होत्या. दीड महिने या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली; परंतु, सर्व कंपन्या तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्या. त्यामुळे महिनाभरापूर्वी विद्युत विभागाने फेरनिविदा राबवली. त्यात सहा कंपन्या मैदानात आहेत. दरम्यान, चार्जिंग स्टेशनसाठी ज्या इच्छुक कंपन्यांनी भरलेल्या कागदपत्रांपासून ते इतर तांत्रिक बाजू तपासल्या जाणार आहे.या कंपन्या सहभागीमनीष फ्लोअर मिल प्रा.लि.झिहा इंटरनॅशनल प्रा.लि.अनक्यु एंटरप्रायजेसटेक सो चार्ज झोनछबी इलेक्ट्रिकल प्रा.लि.निना हॅण्डसपहिल्या टप्प्यातील चार्जिंग स्टेशनशहरातील अमृतधाम फायर स्टेशन-पंचवटी, फायर स्टेशन-सातपूर, राजे संभाजी स्टेडियम- नवीन नाशिक, कृषी नगर जॉगिंग ट्रॅक- ना. पश्चिम, बी.डी. भालेकर शाळेमागील पार्किंग, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, मनपा खुली जागा, लेखानगर मनपा मैदान अंबड लिंकरोड आदी ठिकाणी चार्जिंग स्टेशन होणार आहेत.शहरातील प्रस्तावित चार्जिंग स्टेशनकरिता फेरनिविदा प्रक्रियेत सहा कंपन्यांनी सहभाग घेतला. आता कागदपत्रांची तांत्रिक तपासणी केली जाईल.-उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, नाशिक मनपा

टॅग्स :Nashikनाशिकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर