शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आता स्मशानभूमीचे बुकिंगही ॲपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 01:03 IST

अमरधाममध्ये मृतदेह नेणाऱ्यांना वेटिंगवर राहावे लागते. पुरेशी माहिती नसल्याने तेथे गेल्यावर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे कळते. मृतदेह बरोबर आणलेला आणि अंत्यसंस्काराला विलंब अशावेळी नागरिकांची कोंडी होती. त्यावर नाशिक महपाालिकेने आता ॲपचा तोडगा काढला आहे.

ठळक मुद्देनवीन सुविधा : अमरधाममधील प्रतीक्षा थांबणार

नाशिक : अमरधाममध्ये मृतदेह नेणाऱ्यांना वेटिंगवर राहावे लागते. पुरेशी माहिती नसल्याने तेथे गेल्यावर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे कळते. मृतदेह बरोबर आणलेला आणि अंत्यसंस्काराला विलंब अशावेळी नागरिकांची कोंडी होती. त्यावर नाशिक महपाालिकेने आता ॲपचा तोडगा काढला आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील बेडची स्थिती आणि अन्य माहिती या ॲपवर मिळेलच, परंतु आगाऊ टाइम स्लॉटही बुक करता येणार आहे. नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्य वाढत असताना मृत्युदरही वाढला आहे. १ ते १६ एप्रिलपर्यंत नाशिक शहरातील अमरधाममध्ये १७९३ कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर उपचार करण्यात आले. कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास अन्य कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी विद्युत किंवा डिझेल शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे आदेश आहेत. मात्र, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मेाठ्या प्रमाणात कोेरोनाबाधितांचे मृत्यू झाले आणि त्यानंतर अमरधाममध्ये तीन तीन दिवसांचे वेटिंग सुरू झाल्यानंतर अखेर महापालिकेने लाकडाच्या मदतीने पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यासदेखील मान्यता दिली. शहरात १७ अमरधाम आहेत. त्यात सत्तर बेड आहेत. गेल्या काही दिवसांत मृतांचा आकडा कमी झाला असला तरी चाळीस ते पन्नास बळी रोजच होत आहेत. त्यातच नाशिक आणि पंचवटी अमरधाममध्येच अंत्यसंस्काराला प्राधान्य दिले जाते. तेथे लागणारा वेळ बघता अन्य कोणत्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे ठरवले तर त्याबाबत नागरिकांना माहितीही नसते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आता ॲप तयार करण्याचे आदेश दिले आहेत. ॲपवर असणार अद्ययावत माहितीया ॲपवर शहरातील स्मशानभूमींची सर्व अद्ययावत माहिती असेल. कुठल्या स्मशानभूमीत बेड आहेत, त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नोंदणी झाली आहे काय, याबाबत माहिती असेल; परंतु त्याचबरोबर एखाद्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी जायचे असेल तर त्यासाठी अमरधाममध्ये न जाताही मोबाईल ॲपवरून नोंदणी करता येईल, त्यासाठी मृत्यूचे प्रमाणपत्र नोंदवणे आवश्यक राहील, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDeathमृत्यूMobileमोबाइल