येवल्यातील बांधकामांना आता आॅनलाइन परवानगी
By Admin | Updated: February 16, 2016 23:13 IST2016-02-16T22:09:37+5:302016-02-16T23:13:30+5:30
येवल्यातील बांधकामांना आता आॅनलाइन परवानगी

येवल्यातील बांधकामांना आता आॅनलाइन परवानगी
येवला : नगरपालिका हद्दीत आता आॅनलाइन बांधकाम परवानगी देण्यात येणार असल्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय व प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी बांधकाम परवानाधारक अभियंत्यांसह पर्यवेक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी आॅनलाइन बांधकाम परवानगी संबंधीची संकल्पना व मार्गदर्शक तत्त्वे उपस्थिताना सविस्तर सांगितली. यासंबंधी येवला नगरपालिका हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे बांधकाम परवानगी आॅनलाइन प्रणालीद्वारे सादर करण्याची उपस्थितांनी हमी दिली. या बैठकीस नगर अभियंता जयेश भैरव, मुख्य लिपिक पी. वाय. मांडवडकर यांच्यासह संजय पाटील, सारंग पाटील, मंगेश पैठणकर, अमित लाड, भूषण लाड, प्रशांत शिनकर, विशाल चंडालिया, अमोल असलकर, नितीन बोरसे, तलत शेख, अझहर अन्सारी, अश्पाक शहा आदि उपस्थित होते. (वार्ताहर)