आता रविवारी होणार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप

By Admin | Updated: October 8, 2014 01:32 IST2014-10-08T01:31:19+5:302014-10-08T01:32:21+5:30

आता रविवारी होणार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप

Now allocation of voter papers will be held on Sunday | आता रविवारी होणार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप

आता रविवारी होणार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप

नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदार चिठ्ठ्या वाटपाची कार्यवाही राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. दि. ११ सप्टेंबरपर्यंत ज्या मतदार चिठ्ठ्या वाटप होणार होत्या त्या सर्व मतदार चिठ्ठ्या दि. १२ आॅक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहिमेची आखणी करून (सकाळी ११ ते दु. २ दरम्यान) वितरित करण्यात येणार आहेत. त्यानंतरही वितरित होऊ न शकणाऱ्या मतदार चिठ्ठ्या या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बीएलओंमार्फत वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

Web Title: Now allocation of voter papers will be held on Sunday