व्यावसायिकांना नोटिसा
By Admin | Updated: November 19, 2014 01:28 IST2014-11-19T01:26:43+5:302014-11-19T01:28:07+5:30
व्यावसायिकांना नोटिसा

व्यावसायिकांना नोटिसा
नाशिक : शासनाच्या कायद्यानुसार वैद्यकीय व्यावसायिकांनी पालिकेकडे परवानगीचे नूतनीकरण करणे बंधनकारक असूनही तसे न करणाऱ्या शहरातील व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहेच; परंतु नोंदणी परवान्याचे नूतनीकरण करणेही आवश्यक आहे. शहरातील ६७७ वैद्यकीय व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे; परंतु अद्यापही ६५६ व्यावसायिकांनी नोंदीच केलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अधिनियमातील तरतुदीनुसार वर्षभरात परवान्याने नूतनीकरण न केल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जातो. त्यानंतरच्या वर्षी पन्नास रुपये प्रतिदिन याप्रमाणे दंड आकारला जाऊ शकतो, तर त्यानंतरच्या पुढील वर्षी नोंदणी न केल्याचे आढळल्यास कारावासापर्यंत कारवाई होऊ शकते. अर्थात, पालिकेकडे अर्ज दाखल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यामुळेदेखील कागदपत्रांची जुळवाजुळव करताना वैद्यकीय व्यावसायिकांची दमछाक होत आहे.