मनपाच्या ३२४ गाळेधारकांना बजावल्या नोटिसा
By Admin | Updated: October 25, 2016 01:09 IST2016-10-25T01:07:29+5:302016-10-25T01:09:03+5:30
सुनावणी : पोटभाडेकरूसंबंधी विचारला जाब

मनपाच्या ३२४ गाळेधारकांना बजावल्या नोटिसा
नाशिक : १३ जून २०१६ रोजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मनपाच्या मालकीच्या १९७३ गाळ्यांबाबत अचानक राबविलेल्या सर्वेक्षणात विविध स्वरूपात त्रुटी आढळून आलेल्या ३२४ गाळेधारकांना मनपाने नोटिसा बजावल्या असून, त्याबाबतची सुनावणी सुरू झाली आहे. सोमवारी (दि.२४) नाशिक पश्चिम विभागातील १०३ पैकी ९० गाळेधारकांनी हजेरी लावत उपआयुक्तांपुढे आपले म्हणणे मांडले. मंगळवारी अन्य पाचही विभागांतील गाळेधारकांची सुनावणी होणार आहे.
महापालिकेची एकूण ५८ व्यापारी संकुले असून, त्यात १९७३ गाळे आहेत. मनपाचे गाळे पोटभाडेकरूंना देण्यात येऊन कमाई केली जात असल्याचे तसेच काही गाळे परस्पर विक्री करण्याचेही प्रकार घडले असल्याचे आरोप स्थायी समिती व महासभेवरही सदस्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जून महिन्यात मनपाच्या संपूर्ण गाळ्यांची अचानक तपासणी केली होती. या मोहिमेची कमालीची गुप्तता पाळली गेली होती. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळी गाळेधारकावर प्रश्नांचा भडिमार करत त्यांच्याकडून माहिती संकलित केली होती. गाळ्यामध्ये जो कुणी उपलब्ध असेल त्याला ‘गाळा कुणाचा’ हा प्रश्न विचारला गेला होता. त्यापाठोपाठ एक विहित नमुन्यातील फॉर्म भरून घेतानाच व्हॅट, सेल्सटॅक्स रजिस्ट्रेशन, शॉप अॅक्ट लायसेन, विद्युत देयके व त्यावरील मूळ गाळेधारकाचे नाव आदि माहिती संकलित करण्यात आली होती. शिवाय सोबत दुकानाच्या फलकापासून ते ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलबुकापर्यंतचे छायाचित्रण व चित्रीकरण करण्यात आले होते. अचानक झालेल्या या झाडाझडतीमुळे पोटभाडेकरू असलेल्या व्यावसायिकांची भंबेरी उडाली, तर काहींनी शटर डाउन करत पळ काढला होता. दरम्यान, गेडाम यांची बदली झाल्यानंतर या सर्वेक्षण अहवालावर कारवाई होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती,