शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आल्या नोटिसा,  घरे खाली करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:25 IST

पावसाळा आला की महापालिकेच्या वतीने पूर्वतयारीचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या जातात, त्यानुसार यंदाही संपूर्ण शहरातील ३९७ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, धोकादायक भाग उतरवून घेण्यास सूचित करण्यात आले आहे.

नाशिक : पावसाळा आला की महापालिकेच्या वतीने पूर्वतयारीचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या जातात, त्यानुसार यंदाही संपूर्ण शहरातील ३९७ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, धोकादायक भाग उतरवून घेण्यास सूचित करण्यात आले आहे. तथापि, बहुतांशी नागरिक नोटिसांना प्रतिसाद देत नाही त्यातच गेल्यावर्षी तांबट लेन येथे वाडा पडून घडलेल्या दुर्घटनेत दोन जणांचा बळी गेल्यानंतरदेखील रहिवासी जागचे हलले नव्हते त्यामुळे महापालिकेच्या नोटिसांच्या सोपस्काराने काय होणार? असा प्रश्न केला जात आहे.संपुर्ण शहराच्या गावठाण भागातील जुने वाडे असून, अनेक वाडे शंभर-दीडशे वर्ष जुने आहेत. बहुतांशी वाडे धोकादायक झाले असून, ते पडण्याच्या स्थितीत आहेत. काही ठिकाणी भाडेकरू आणि घरमालक वाददेखील आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी नोटिसा बजावल्या जातात, परंतु त्याचा परिणाम अत्यंत नगण्य स्वरूपात होतो. यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एकूण ३९७ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.यात पंचवटीत १५०, नाशिक पश्चिममध्ये १०३, नाशिक पूर्व विभागात ३९, नाशिकरोड विभागात ६७, सातपूरमध्ये १५ तर सिडको विभागात २३ अशा ३९७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्व विभागात सर्वाधिक वाडे असताना अन्य विभागात संबंधितांनी धोकादायक भाग त्वरित उतरवून घ्यावेत, अन्यथा महापालिकेच्या वतीने असे धोकादायक भाग उतरवून संबंधितांकडून खर्च वसूल केला जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.काजीगढीचा प्रश्न कायमगेल्या काही वर्षांपासून जुन्या नाशकातील काजीगढी ढासळू लागल्याने धोका वाढला आहे. महापालिकेने संबंधितांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करून उपयोग झालेला नाही. पोलिसांमार्फत नोटिसा बजावूनही उपयोग झालेला नाही. आताही जिल्हा प्रशासनाने महापालिकेला पत्र दिले असून, काजीच्या गढीबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्र्देश दिले आहेत. महापालिका त्यावर काय भूमिका घेते हे महत्त्वाचे आहे.तांबट लेनमधील  प्रश्न कायमगेल्यावर्षी तांबट लेनमध्ये वाडा पडल्यानंतर महापालिकेने संबंधिताना तेथे राहण्यास मनाई करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यावर कारवाई न झाल्याने पोलीस ठाण्यास पत्र दिले होते. परंतु पोलीस खात्यानेदेखील अंग काढून घेतले होते त्यामुळे नोटिसांच्या सोपस्कारापलीकडे काय होणार हा प्रश्न आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस