स्टेशनवाडीत घरे खाली करण्यासाठी नोटिसा
By Admin | Updated: December 20, 2015 22:52 IST2015-12-20T22:47:14+5:302015-12-20T22:52:48+5:30
निवेदन : परिसरातील रहिवाशांची पुनर्वसन करण्याची मागणी

स्टेशनवाडीत घरे खाली करण्यासाठी नोटिसा
देवळाली कॅम्प : येथील स्टेशनवाडी परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांना प्रशासनाने घरे खाली करण्यासाठी नोटीस बजावली असून, येथील रहिवाशांनी एकत्र येत छावणी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर प्रदीप कौल यांना निवदनाद्वारे आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली आहे. यावेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक दिनकर आढाव आदि मान्यवर उपस्थित होते.
ब्रिगेडीयर कौल यांनी निवेदनकर्त्यांना सांगितले की, मानवीय दृष्टिकोनातून तुमच्या भावना आम्ही जिल्हाधिकारी, राज्य शासन यांना कळविणार आहोत.
निर्वासित होणाऱ्या नागरिकांना राजीव गांधी घरकुल योजना, इंदिरा आवास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देत निर्वासित होण्यापासून वाचवावे, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
निवेदनावर कल्पना पवार, दीपक उन्हवणे, जगन पवार, विनोद भगवाने, विकास आहिरे, गीता जोसेफ, कुणाल भवार आदिंसह वॉर्ड क्र. ५ मधील रहिवाशांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)