शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या गाळेधारकांना भाडे वसुलीच्या नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:31 IST

राज्यमंत्र्याच्या सूचनेला हरताळ : भरणा न केल्यास गाळे रिक्त करण्याची कारवाई

ठळक मुद्देगाळेधारकांना नवीन भाडेवाढीनुसार सन २०१४ पासून थकबाकीसह रक्कम भरण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेतगेल्या तीन वर्षांपासून आधी मनसेच्या सत्ताकाळात तर आता भाजपाच्या सत्ताकाळात गाळेधारकांकडून सदर भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली जात आहे

नाशिक - महापालिकेच्या गाळेधारकांकडून जुन्याच दराने भाडेवसुली करण्यात यावी, याबाबतचे आदेश राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी प्रशासनाला देऊनही गाळेधारकांना नवीन भाडेवाढीनुसार सन २०१४ पासून थकबाकीसह रक्कम भरण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाळेधारकांचे धाबे दणाणले आहे. नवीन भाडेवाढीनुसार रकमेचा भरणा न केल्यास संबंधितांचे गाळे रिक्त करुन घेऊन अन्य मार्गाने भाडेवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरात महापालिकेच्या मालकीचे १९७० गाळे आहेत. महापालिकेने या गाळेधारकांना २०१४ पासून रेडीरेकनरनुसार नवीन भाडेवाढ लागू केलेली आहे. परंतु, या भाडेवाढीस गाळेधारकांनी विरोध दर्शविला आहे. गेल्या तीन वर्षांपासून आधी मनसेच्या सत्ताकाळात तर आता भाजपाच्या सत्ताकाळात गाळेधारकांकडून सदर भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, १७ जानेवारी २०१८ रोजी आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या दालनात मनपा गाळेधारक संघटनेचे पदाधिकाºयांसमवेत बैठक झाली होती. या बैठकीत रणजीत पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून गाळेभाडेवाढीसंबंधी धोरणात्मक निर्णय झाल्यानंतर १ एप्रिल २०१७ पासून नवीन भाडेवाढ लागू करण्याचे आणि तोपर्यंत गाळेधारकांकडून जुन्याच दराने भाडे वसुली करण्याच्या तोंडी सूचना महापालिकेच्या अधिका-यांना दिल्या होत्या. मंत्रिमहोदयांच्या आदेशामुळे गाळेधारकांना दिलासा मिळाला, असे चित्र निर्माण झाले असतानाच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, मिळकत विभागाकडून गाळेधारकांना नवीन दरानुसारच भाडेवसुलीच्या नोटीसा पाठविण्यात आल्याने गाळेधारकांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेने आतापर्यंत सुमारे ५०० गाळेधारकांना नोटीसा बजावल्या असून सदर नवीन भाडेवाढ २०१४ पासून थकबाकीसह भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित गाळेधारकांनी ७ दिवसांच्या आत थकबाकीसर भाड्याची रक्कम भरली नाही तर संबंधितांचा गाळा रिकामा करुन घेऊन अन्य मार्गाने त्याच्याकडून वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यमंत्र्यांकडे गाळेधारकांचे अपीलभाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन धोरण निश्चित होईपर्यंत जुन्याच दराने भाडेवाढ वसुल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिकेने नोटीसा पाठविल्याने गाळेधारक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असता, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे अपील दाखल करण्यात आल्याची माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष अविनाश शिरसाठ व सचिव दीपक लोढा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका