नोटिसांचे कागदी घोडे, मोडकळून पडताहेत जुने वाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:35+5:302021-05-30T04:12:35+5:30
नाशिक शहरातील जुने नाशिक आणि पंचवटी गावठाण भागात अनेक वाडे बिकट अवस्थेत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात वाड्यांमध्ये पाणी मुरते आणि ...

नोटिसांचे कागदी घोडे, मोडकळून पडताहेत जुने वाडे
नाशिक शहरातील जुने नाशिक आणि पंचवटी गावठाण भागात अनेक वाडे बिकट अवस्थेत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात वाड्यांमध्ये पाणी मुरते आणि वाडे पडतात. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला की महापालिकेच्या वतीने गावठाणातील वाड्यांना नोटिसा बजावून घर घाली करावे आणि स्थलांतरित व्हावे अशा नोटिसा बजावल्या जातात. त्याचे पुढे काय होते हे कोणीच पहात नाही. अनेक वाडे घरमालक आणि भाडेकरू वादात अडकले आहेत. वाड्यांचे पुनर्विकास झाला तर फ्लॅट मिळेल या अपेक्षेने भाडेकरू जीव धोक्यात घालून तेथेच वास्तव्य करीत आहेत. बहुतांश प्रकरणे तर न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे नोटिसा कागदावरच राहतात आणि दरवर्षी वाडे पडतात. गेल्या दोन पावसाळ्यांमध्ये तर जीवितहानीदेखील झाली आहे. मात्र, त्यानंतर देखील ठोस निर्णय महापालिकेने घेतलेला नाही.
इन्फो...
२०१७ मध्ये महापालिकेच्या शहर विकास आराखड्यात गावठाण विभागात क्लस्टर साकारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेने आघात मूल्यमापन अहवालदेखील पाठवला आहे. मात्र, त्यानंतर योजना थंड बस्त्यात गेली आहे. त्याचा पाठपुरावा सोडून केवळ नोटिसांचे सोपस्कार पार पाडले जात आहेत.
इन्फेा..
नेत्यांच्या इशाऱ्यावर निघतात नोटिसा
शहरातील जुन्या गावठाणाताील बहुतांशी वाडे त्याच त्या भागातील राजकीय नेते पुनर्विकासासाठी घेतात. काही नेत्यांचे तर परिसरदेखील ठरले असून त्यांना टाळून कोणाला खरेदी-विक्री व्यवहार करता येत नाही. धोकादायक वाडे ठरवून अनेकदा नोटिसा देण्याचे काम राजकीय नेत्यांमार्फत हेाते. अनेक वाडेकरी दुरुस्तीसाठी अर्ज घेऊन जातात; मात्र नगररचनाचे संबंधित अभियंते अशावेळी परवानगी देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे वाडे आणि घरे धोकादायक ठरवणारे नगररचना विभागाचे काही अभियंतेच संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
इन्फो..
त्याच त्या वाड्यांना दरवर्षी नोटिसा
महापालिकेने त्याच त्या वाड्यांना नोटिसा देण्याची परंपरा पाळली असली तरी एकदा नाेटिसा दिल्यानंतर पुढे काय होते, याबाबत नगररचना विभागाचे अभियंता कधीच लक्ष देत नाही. त्यामुळे त्याच त्या वाड्यांना पुन: पुन्हा नोटिसा दिल्या जात आहेत.