रजेवर गेलेल्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:44+5:302021-02-05T05:42:44+5:30

नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात असून, जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय विभागांचा ...

Notice to the officer of Pollution Control Corporation who is on leave | रजेवर गेलेल्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यास नोटीस

रजेवर गेलेल्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यास नोटीस

नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात असून, जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय विभागांचा आढावा घेतला जातो. यासंदर्भात गेल्या २९ रोजी झालेल्या बैठकीस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, आठ दिवसात खुलासा करण्यासाठीची मुदत दिली आहे.

‘माझी वसुंधरा’या उपक्रमांतर्गत शासकीय कार्यालयांनी पर्यावरण रक्षणासाठीचे उपक्रम राबवावेत, असे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी या उपक्रमाचे नोडल अधिकारी आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये या माध्यमातून उपक्रम राबविले जात आहेत. सध्या जिल्ह्याचा गौण खनिज आराखडा तयार करण्याचे महत्त्वाचे काम सुरू आहे. त्यासाठी संबंधित विभागांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही घेण्यात आली. या बैठकीस प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी पूर्वसुचना न देता गैरहजर राहिल्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

सध्या पर्यावरणाच्या बाबतीत अधिक दक्षता घेतली जात असल्याने जिल्ह्याचा गौण खनिज आराखडा तयार करण्याचे महत्त्वाचे काम सुरू आहे. यानिमत्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमर दुरगुळे अनुपस्थित राहिले. बैठकीत त्यांनी प्रतिनिधी पाठविला असला तरी कोणतीही पूर्वकल्पना न देता ते रजेवर निघून गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर ताशेरे ओढले. पर्यावरणासारख्या गंभीर बैठकीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना नोटीस बजविण्यात आली असून, याप्रकरणी योग्य तो खुलासा करावा, यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे.

Web Title: Notice to the officer of Pollution Control Corporation who is on leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.