आडगाव : नवीन आडगावनाका परिसरातील नामांकित स्वामी नारायण संस्थेची स्वामी नारायण इंग्लिश मिडियम स्कूलची इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्राविना वापर सुरू असल्याने महानगरपालिका नगररचना विभागाने बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस बजावल्याने पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे.तपोवन ब्रह्मचारी आश्रम या संस्थेच्या वतीने नवीन आडगावनाका परिसरात बाहेरून शिकण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुकुल शिक्षण पद्धतीप्रमाणे शिक्षण दिले जात असे. या संस्थेची १०० वर्षांपासून गुरुकुलाची पद्धत होती, पण नंतर काळानुरूप बदल स्वीकारून गेली काही वर्षांपासून स्वामी नारायण मंदिर ट्रस्ट या संस्थेने गुरुकुल पद्धत बंद करून याच परिसरात नवीन शैक्षणिक पद्धतीने इंग्लिश मिडियम शाळा सुरू केली असून, तपोवनजवळ स्वामी नारायण ट्रस्टची स्वामी नारायण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात, पण शाळेच्या इमारतीचा वापर भोगवटा प्रमाणपत्राविना सुरू असल्याने बेकायदेशीर बांधकामाबाबत नगररचना विभागाचे शाखा अभियंता जे. बी. राऊत यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावून १५ दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिलेले आहे आणि खुलासा न केल्यास बांधकाम अनधिकृत म्हणून पडण्यात येईल व संपूर्ण खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
स्वामी नारायण शाळेला मनपाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:20 IST
नवीन आडगावनाका परिसरातील नामांकित स्वामी नारायण संस्थेची स्वामी नारायण इंग्लिश मिडियम स्कूलची इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्राविना वापर सुरू असल्याने महानगरपालिका नगररचना विभागाने बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस बजावल्याने पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे.
स्वामी नारायण शाळेला मनपाची नोटीस
ठळक मुद्देअनधिकृत बांधकाम : खुलासा मागविला